www.24taas.com, धुळे
मिरची निर्यातीच्या माध्यमातून एक सामन्य शेतकरी विदेशात देशाचं नाव उज्ज्वल करतोय. धुळे जिल्ह्यातील चिचखेडा येथे राहणा-या अल्प शिक्षित अनिल पाटील या शेतक-याने बाजारपेठेचं गणित समजून घेत हे कामगिरी बजावलीय. गुणवत्तेच्या जोरावर उत्पादीत केलेली मिरची थेट लंडन,रशिया आणि दुबईत पाठवण्याचा धाडसी पराक्रम त्यांनी केला आहे.
धुळे जिल्ह्यातील चिचखेड्यातील याच अनिल पाटील यांनी थेंबे थेंब तळे साचवून कृषीमालाची थेट निर्यातीपर्यंत झेप घेतलीय..दर्जेदार मिरचीचं पीक घेऊन त्यांनी ऐन दुष्काळात मिरचीचं भरघोस उत्पादन घेतलंय...अनिल पाटील यांचं तसं २५ एकर कोरडवाहू क्षेत्र. त्यात त्यांनी ३४ बाय ३४ मिटरचं शेततळ शासनाच्या योजनेतून करुन घेतलं. या शेततळ्यात ७ लाख लिटर पाणी साठवलं जातं. या शेततळ्यासाठी त्यांना ३ लाख वीस हजार रुपये इतका खर्च आला मात्र शासनाकडून अनुदानापोटी त्यांना ३ लाख रुपये मिळालं म्हणजे फक्त वीस हजार रुपयांचा खर्च त्यांना आला. ७ लाख लिटर क्षमत असलेल्या शेततळ्यातून त्यांनी आपली ६ एकर शेती बागायत करुन मिरचीचं दर्जेदार उत्पादन घेतलंय..
अनिल पाटील यांनी सहा एकरारवर नंदिनी जातीची हिरव्या मिरचीचं पीक घेतलंय. त्यांचं शास्त्रोक्त व्यवस्थापनेमुळे एकरी दोन ते अडिच लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. तीन लाख रुपयांचा सर्व सहा एकराचं खर्च वजा जाता त्यांना अंदाजे बारा लाखांचा नफा मिळण अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षापासून त्यांनी उत्पादीत केलेली मिरची ते लंडनला पाठवतात.
विद्शात गुणवत्तेला प्राधन्य दिले जातं त्यामुळे त्यांनी अनेक शेतक-यांना एकत्र करुन गुणवत्तापूर्ण उत्पादनाचं तंत्र शिकवलं.शेतक-यांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिलाय.त्यांच्या प्रेरणमुळे पाटील यांनी यावर्षी लंडन,रशिया आणि दुबईतली बाजारपेठ काबीज केलीय.
अनिल पाटील यांची ही यशोगाथा सगळ्यांनाच प्रेरणा देणारी आहे मात्र पाण्याचं नियोजन खरंच किती जण करतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज कमी क्षेत्रात दर्जादार आणि विक्रमी उत्पादनाचं तंत्र उपलब्ध आहे गरज आहे ती फक्त उपलब्ध पाण्याचं नियोजन करण्याची. दुष्काळाच्या तोंडावर टाहो फोडून तटस्थपणे प्रश्न निकालात न काढणा-या सरकारकडून अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाही. हि बाब ज्यावेळेस शेतक-यांच्या लक्षात येईल त्यावेळेस तुमची प्रगतीकडे वाटचाल सुरु झालेली असेल हे मात्र नक्की.