www.24taas.com, झी मीडिया, नंदूरबार
नंदूरबारचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात येतोय. विशेष म्हणजे सर्वसामान्य छोट्या विक्रेत्यांपासून मोठया व्यापा-यांपर्यंत सगळ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग घेतलाय.
जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया यांची जालन्याला जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आलीय. चौदा महिन्यांपूर्वी त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी पदाची सुत्रं हाती घेतली होती. या चौदा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेत आपल्या पारदर्शक कारभाराची छाप पाडली होती. यासोबतच जिल्हाधिकारी बकोरीया यांनी लँडमाफीया, वाळूमाफीयांमध्ये कमालीची दहशत निर्माण केली होती.
त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी काही राजकारणी प्रयत्नशील होते, त्यातूनच त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे. कर्तव्यदक्षपणे सेवा देणार्या जिल्हाधिकार्यांची टर्म पूर्ण होण्याआधीच बदली झाल्याच्या निषेधार्थ अनेक संघटना रस्त्यावर उतरल्यायत. शासनाने 24 तासांत बदली रद्द न केल्यास जिल्हाभरात चक्काजाम करण्याचा इशारा आदिवासी महासंघ आणि लोकसंघर्ष मोर्चानं दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.