चंद्रपूरची मानसी पटकावणार मिस युनिव्हर्सचा ताज?

मानसी मोघे ही चंद्रपूरची कन्या थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करतेय. २१ वर्षांची मानसी सध्या मॉस्कोमध्ये होत असलेल्या स्पर्धेसाठी रशियात पोहोचलीये.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 6, 2013, 05:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
मानसी मोघे ही चंद्रपूरची कन्या थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करतेय. २१ वर्षांची मानसी सध्या मॉस्कोमध्ये होत असलेल्या स्पर्धेसाठी रशियात पोहोचलीये. ९ नोव्हेंबरला होणा-या मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत तिनं सौंदर्यसम्राज्ञीचा मुकुट जिंकावा, अशी प्रार्थना तिच्या कुटुंबियांबरोबरच चंद्रपूरकर देखील करतायत...
जगातल्या सौंदर्यवती महिलांचा मेळा सध्या मॉस्कोत भरलाय. निमित्त आहे ते मिस युनीवर्स 2013 स्पर्धेच. मॉस्कोत सुरु असलेल्या या स्पर्धेकडं महाराष्ट्राचं विशेषत: चंद्रपूरकरांचं विशेष लक्ष लागलंय. त्याचं कारणही तितचं खास आहे. मानसी मिलींद मोघे ही 21 वर्षांची चंद्रपूर कन्या सध्या या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतीय. मानसीचे आई-वडील दोघेही वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड मध्ये या सरकारी खाण कंपनीत वैद्यकीय अधिकारी रुपात कार्यरत आहेत. गेले काही वर्षे चंद्रपूर WCL क्षेत्रीय रुग्णालयात दोघेही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतायत. सौंदर्यवती मानसी या दाम्पत्त्याची ज्येष्ठ कन्या. आपली कनिष्ठ कन्या जागृतीसह हा परिवार मानसीच्या मिस युनिवर्स स्पर्धेतील यशाकडे डोळे लावून बसलाय.

आपल्या सोबत खेळणारी ,मस्ती करणारी आपली बहिण आता जागतिक स्पर्धेत यशाच्या उंबरठ्यावर असल्याने तिच्या लहान बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झालाय. या स्पर्धेतील काही टिप्स आपण तिला दिल्याचे ती लाजून सांगते. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी तिने मानसीच्या आवडीचे गीत गाउन तिला शुभेच्छा दिल्या.
९ नोव्हेंबरपासून मिस युनीवर्स स्पर्धेची अंतिम फेरी सुरु होतीय. त्यासाठी आता मानसीला शुभेच्छांची गरज आहे. मानसीच्या निमित्ताने एका मराठी कन्येने सौंदर्यवतीचा किताब सर करावा अशीच प्रार्थना सारे चंद्रपूरकर करतायत

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.