'लायकी दाखवणाऱ्यांबरोबर सत्तेत का बसता?'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेची लायकी महाराष्ट्राला दाखवतात, मग तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत का बसता, असा बोचरा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. 

Updated: Feb 12, 2017, 11:03 PM IST
'लायकी दाखवणाऱ्यांबरोबर सत्तेत का बसता?' title=

ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेची लायकी महाराष्ट्राला दाखवतात, मग तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत का बसता, असा बोचरा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेनं ठाणेकरांचा मालमत्ता कर वाढवला आणि आता सत्ता दिली तर मालमत्ता कर कमी करण्याचं ते आश्वासन देतात. हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे. शिवसेनेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका पवारांनी केली आहे. ठाण्यातल्या कळवा खारेगावमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेमध्ये शरद पवारांनी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.