मुंबई : राज ठाकरे हे एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष असले तरी ते आधी मतदारही आहेत. २१ फेब्रुवारीला ते महापालिका निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील पण त्याआधी ते राहत असलेल्या वॉर्डातील मनसेच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे ह्या 'कृष्णकुंज'वर प्रचाराच्या अंतिम टप्यात धडकतात. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्याच पक्षाचे उमेदवार जोरदार प्रयत्न करत आहेत.
ज्या पक्षाच्या तिकिटावर स्वप्ना देशपांडे निवडणूक लढवतायत त्याच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी त्या पोहोतल्या. यावेळेस खुद्द राज ठाकरे घराबाहेर येतात आणि स्वप्ना देशपांडे यांना भेटतात. त्यावेळेस ते त्यांचं निवडणूक चिन्ह कितव्या क्रमांच्या नंबरवर आहे हे राज ठाकरे यांना सांगतात. राज ठाकरे देखील त्याला मजेशीरपणे घेतात. राज ठाकरे यांच्या पत्नी देखील यावेळेस तेथे उपस्थित होत्या. यावेळेस एक मजेशीर संवाद घडला. पाहा नेमकं काय झालं.
पाहा व्हिडिओ