'नाईट लाईफशिवाय करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत'

मुंबईच्या नाईट लाईफला विश्व हिंदू परिषदेने विरोध केलाय. या नाईट लाईफ संस्कृतीचा लाभ गुन्हेगार तसेच उच्चभ्रू लोकांना होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढुन अनैतिक गोष्टींना बळ मिळेल आणि पोलीस यंत्रणेवरही त्याचा ताण पडेल, असं विहींप केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी म्हटलंय. 'करण्यासारख्या दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत त्या कराव्यात' अशी सूचना वजा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिलाय. सरकारने हा निर्णय लागू करू नये, असंही आबदेव यांनी म्हटलंय.

Updated: Feb 19, 2015, 12:11 PM IST
'नाईट लाईफशिवाय करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत' title=

मुंबई : मुंबईच्या नाईट लाईफला विश्व हिंदू परिषदेने विरोध केलाय. या नाईट लाईफ संस्कृतीचा लाभ गुन्हेगार तसेच उच्चभ्रू लोकांना होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढुन अनैतिक गोष्टींना बळ मिळेल आणि पोलीस यंत्रणेवरही त्याचा ताण पडेल, असं विहींप केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी म्हटलंय. 'करण्यासारख्या दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत त्या कराव्यात' अशी सूचना वजा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिलाय. सरकारने हा निर्णय लागू करू नये, असंही आबदेव यांनी म्हटलंय.

पार्टी ऑल नाईट... पब, डिस्को, बार 24 X 7
आता फुल्टू पार्टी करायची... अगदी रात्रभर... बिनधास्त, बेहोश होऊन... कारण लवकरच मुंबईत बार, पब्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि कॅफे 24 X 7 सुरू राहणार आहेत. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या कृपेनं मुंबईकरांना आता 'नाइट लाइफ' एन्जॉय करता येणार आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या नाइट लाईफच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवलाय. त्यादृष्टीनं कायद्यात सुधारणा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय... तर हॉटेल व्यावसायिकांनीही हा प्रस्ताव उचलून धरलाय.
 
मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी मात्र नाईट लाइफबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आधीच मरिन लाइन्सला दिवे लावण्यावरून आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात वाद पेटला होता. आता नाइट लाइफवरून पुन्हा दोघांमध्ये खटका उडालाय. 'केवळ उच्चभ्रूंच्या पार्ट्यांसाठी नाइट लाइफ नको. उच्चभ्रूंच्या नाईटलाईफपेक्षा सामान्यांचं जीवनमान उंचावणं महत्त्वाचं आहे. नाईट लाइफमध्ये वडापाव आणि पावभाजी विक्रेत्यांनाही स्थान मिळावं. नाइट लाइफसाठी सर्वसमावेशक धोरण हवं' असा सल्ला शेलारांनी सोशल वेबसाईटवरून दिलाय.
 
तर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून चिमटे काढलेत. 'मुंबई नाईट लाइफसाठी खूप काही केलं जातंय, हे पाहून आनंद वाटला! हॉटेल्स आणि बारवाल्यांप्रमाणं शिवसेना शिववडा स्टॉल्सची देखील काळजी घेणार का? ज्यासाठी शिवसेना नेते एवढी मेहनत घेत आहेत... ते फाइव्ह स्टार हॉटेल्स, बारमधलं नाइट लाइफ किती मराठी कुटुंबांना परवडणार आहे का?' असा बोचरा सवाल राणेंनी केलाय.
 
यावर, नाईट लाईफवरून राजकारण करू नये, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.