पंतप्रधानांनी केलं शिवरायांचं स्मरण, ट्विटरवरून महाराजांना वंदन

आज तारखेप्रमाणे सरकार शिवजयंती साजरी करतं. शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांचं स्मरण करत, ट्विटरवरून महाराजांना वंदन केलंय. 

Updated: Feb 19, 2015, 08:30 AM IST
पंतप्रधानांनी केलं शिवरायांचं स्मरण, ट्विटरवरून महाराजांना वंदन title=

मुंबई : आज तारखेप्रमाणे सरकार शिवजयंती साजरी करतं. शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांचं स्मरण करत, ट्विटरवरून महाराजांना वंदन केलंय. 

I bow to the epitome of courage & bravery and the pride of India, Chhatrapati Shivaji Maharaj on Shivaji Jayanti.

— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2015

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत असल्याचं म्हणत नरेंद्र मोदींनी नतमस्तक झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 

Shivaji Maharaj shone on the battle field & left a mark in administration. He touched several lives through his good governance.

— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2015

शिवाजी महाराज हे शूर लढवय्ये, उत्तम प्रशासक आणि शौर्याचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढले आहेत. शिवाजी महाराज हे देशाची शान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Chhatrapati Shivaji inspires us greatly. Here is a speech of mine in Raigad last year in which I pay tributes to him. http://t.co/coj66F02gY

— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2015

सोबतच गेल्या वर्षी रायगडावर महाराजांना मानाचा मुजरा देताना केलेल्या भाषणाचं स्मरणही त्यांनी केलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.