खांदेपालटाची ही वेळ नाही - शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेनेत खांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी घेणार असल्याचं आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुखांकडून स्पष्ट करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर नुकतीच आमदारांची बैठक झाली. 

Updated: Apr 7, 2017, 12:21 PM IST
खांदेपालटाची ही वेळ नाही - शिवसेना पक्षप्रमुख title=

मुंबई : शिवसेनेत खांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी घेणार असल्याचं आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुखांकडून स्पष्ट करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर नुकतीच आमदारांची बैठक झाली. 

यावेळी, 'तुमच्या भावनांचा मी आदर करतो मात्र बदलाची ती वेळ नाही, योग्य वेळी निर्णय घेईन' असा शब्द उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिलाय. 

उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला अर्धा तास आमदारांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी मंत्र्यांना वेगळ्या खोलीत बसवण्यात आलं होतं. त्यानंतर मंत्र्यांना आणि आमदारांना आमने-सामने बसवून चर्चा केली. मंत्र्यांनी या बैठकीत बोलणं टाळलं. मात्र, आमदारांच्या निधीसाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं.

ग्रामीण आणि शहरी भागातल्या आमदारांची एक समिती बनवण्यात आली असून ही समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. यामध्ये शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, शहरी भागातील आमदार प्रकाश सुर्वे, अजय चौधरी आणि ग्रामीण भागातील आमदार शंभूराजे देसाई आणि राजेश क्षीरसागर आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. शिवसेना आमदारांना मिळणाऱ्या विकास निधीबाबत यावेळी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलंय.