मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार बाळा नांदगावकरा यांनी दिली. ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठाकरे घराण्याचा व्हावा. राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर त्याचा आपल्याला आनंद होईल. हे दोन भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र दिसले तर आपल्याला आनंद होईल. आपली ठाकरे घराण्यावर श्रद्धा असून ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री व्हावा, असे बाळा नांदगावकर म्हणालेत.
दरम्यान, राज ठाकरे यांचे भाचे निशांत देशमुख यांनी फेसबुकवर 'आता फक्त ठाकरे अधिक ठाकरे सरकार' अशी पोस्ट केल्याने शिवसेना-मनसे युतीची चर्चा सुरु झालेत.
मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य पालिकांतील सत्ता टिकवायची असेल, तर शिवसेनेला मनसेची गरज लागणार हे स्पष्ट दिसत आहे. मुंबई महापालिकेत भाजपाने पाठिंबा काढून घेतला तर मनसेच्या मदतीने ही सर्वात मोठी महापालिका शिवसेना राखू शकते. त्यामुळेच शिवसेना-मनसेच्या एकत्र येण्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.