मुंबई : टाटा सन्स आणि जपानी टेलीकॉम कंपनी डोकोमो यांच्यात निर्माण झालेला वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा निर्णय झालाय. लंडनमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय लवादाच्या निकालानुसार टाटा सन्सनं डोकोमोला 1.18 अब्ज डॉलर्स जमा करण्यास टाटा सन्सनं मान्यता दिलीय.
लंडनच्या लवादानं निर्णय दिल्यावर टाटा सन्स आणि डोकोमोनं दिल्ली हायकोर्टात पुन्हा एकदा याचिका केली होती. पण आता ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या कोर्टाबाहेरच्या तडजोडीत, टाटा सन्स डोकोमोला 1.18 अब्ज डॉलर्स देईल. त्याबदल्ल्यात टाटा सन्सची उपकंपनी असणाऱ्या टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटे़ड या कंपनीला डोमोची हिस्सेदारी मिळेल.. गेल्या दोन वर्षांपासून डोकोमो आणि टाटा सन्स यांच्यात नफ्याच्या वाटपावरून वाद होता.