www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
येत्या दहा ते वीस वर्षांमध्ये पृथ्वीसारखा ग्रह शोधण्यात यश येईल, अशी आशा नासाचे संचालक डॉ. जयदिप मुखर्जी यांनी व्यक्त केलीय.
पृथ्वीसारखे वातावरण आणि जीवन असलेले ग्रह शोधण्याच्या मोहिमेवर नासाचे शास्त्रज्ञ सध्या काम करत आहेत. पृथ्वीच्या आकाराएवढे दोनशे ग्रह या सृष्टीत असून याबाबतचे ठाम पुरावे मात्र अजून नासाकडं उपलब्ध नाहीत. अद्याप तंत्रज्ञान विकसित न झाल्यामुळं पृथ्वीसारखे ग्रह प्रत्यक्ष बघता येत नसले तरी वेगवेगळ्या पद्धतीनं केवळ अंदाज बांधून असे ग्रह असल्याची शक्यता मुखर्जी यांनी व्यक्त केली.
मुंबईच्या वरळी येथील नेहर सेंटरमध्ये `नासा सर्च फ़ॉर अनादर अर्थ` या विषयावर डॉ. जयदेव मुखर्जी बोलत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.