जय जवान गोविंदा पथकाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

जोगेश्वरी येथील मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण त्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथकाने रिट याचिका दाखल केली होती.

Updated: Aug 24, 2016, 01:55 PM IST
जय जवान गोविंदा पथकाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली title=

मुंबई : जोगेश्वरी येथील मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण त्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथकाने रिट याचिका दाखल केली होती.

कोर्टानं सहानुभूतीपूर्वक विचार करुन दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. उत्सवावर निर्णय घेताना गोविंदा पथकाचे मत विचारात घ्यावे अशी विनंती ते या याचिकेतून केली होती.