राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून, १८ ला अर्थसंकल्प

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ९ मार्चपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Updated: Feb 25, 2015, 09:48 AM IST
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून, १८ ला अर्थसंकल्प title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ९ मार्चपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

९ मार्च ते १ एप्रिल असा या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

भाजप-शिवसेना सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. भाजने अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय देण्याचा प्रयत्न झालाय, याची उत्सुकता आहे. तसेच शिवसेना-भाजपमधील कुरबुडीचा या अर्थसंकल्पावर काय परिणार असेल, याचीही चर्चा आहे. भाजपचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार कोणत्या विभागाला झुकते माप देतात, याकडे लक्ष आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.