मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन

मनसेच्या शिवाजी पार्क गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेवेळी आवाजाची मर्यादा ९० डेसिबल्स इतकी होती. तर कार्यकर्त्यांच्या मिरवणूकीचा आवाज १०६ डेसिबल्सपर्यंत पोचला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. त्यामुळे न्यायालयानं मनसेला मेळावा आयोजनासाठी सशर्त परवानगी दिली होती.

Updated: Apr 9, 2016, 11:50 PM IST
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन title=

मुंबई : मनसेच्या शिवाजी पार्क गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेवेळी आवाजाची मर्यादा ९० डेसिबल्स इतकी होती. तर कार्यकर्त्यांच्या मिरवणूकीचा आवाज १०६ डेसिबल्सपर्यंत पोचला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. त्यामुळे न्यायालयानं मनसेला मेळावा आयोजनासाठी सशर्त परवानगी दिली होती.

आयोजकांना ५० डेसिबल्स पर्यंत आवाजाची मर्यादा नेमून देण्यात आली होती. या अटीचं उल्लंघन झाल्याचं प्राथमिकरित्या आढळलंय. शिवाजी पार्क पोलिसांनी अद्याप आयोजकांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंदवलेला नाही. मात्र तो नोंदवला जाईल अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांना येत्या १५ तारखेला न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे.