डॉ. आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्तानं एमएमआरडीए मैदानावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शॅडो शो, थ्रीडी शोसह हरीहरन यांच्या खास गायनातून बाबासाहेबांना अभिवादन करत या कार्यक्रमाला सुरूवात झाली. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून  तीन दिवस बाबासाहेबांच्या विविचारांचा जागर सुरू राहणार आहे.  

Updated: Apr 9, 2016, 11:17 PM IST
डॉ. आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन title=

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्तानं एमएमआरडीए मैदानावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शॅडो शो, थ्रीडी शोसह हरीहरन यांच्या खास गायनातून बाबासाहेबांना अभिवादन करत या कार्यक्रमाला सुरूवात झाली. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून  तीन दिवस बाबासाहेबांच्या विविचारांचा जागर सुरू राहणार आहे.  

नेत्रदीपक सोहळ्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभिनेते आमीर खान, एस्सेल समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा, प्रसिद्ध गायक हरिहरन, संगीतकार अन्नू मलिक, प्रकाश आंबेडकर, डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. सुखदेव थोरात यांनी प्रमुख उपस्थिती लावलीय. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गायन आणि चर्चासत्राच्या रुपानं तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी असणार आहे.