www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिंधुरक्षक पाणबुडीतील बेपत्ता १८ नौसैनिकांपैकी दोन सैनिकांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहेत. अद्याप १६ नौसैनिकांचा शोध सुरू आहे.
मुंबई येथे समुद्र किनाऱ्यावर १३ ऑगस्टच्या रात्री आयएनएस ‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीवर स्फोट होऊन अपघात झाला. स्फोटकांचा आवाज होऊन पाणबुडी आगीच्या भक्षस्थानी पडली. याचवेळी पाणबुडीवर कार्यरत असणारे १७ नौसैनिक बेपत्ता झाले होते.
पाणबुडीची आग विझवण्यात आली तरी ‘सिंधुरक्षक’ला जलसमाधी मिळाली. गुरूवारपासून बेपत्ता नौसैनिकांचा शोध सुरू आहे. अपुरा प्रकाश, अरुंद जागा यामुळे पाणबुड्यांना शोधमोहिमेत अडथळा येत आहे. पाणबुडीत पाणी शिरल्याने आत पोहोचणे कठिण झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.