www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईला ‘मर्स’चा (मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) धोका असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. आता तर नवी मुंबईत ‘मर्स’चा संशयीत रूग्ण सापडल्याने या आजाराची अनेकांनी धास्ती घेतली आहे. आखाती देशात ‘मर्स’चे ४६ बळी गेले आहेत.
मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (मर्स) या आजाराचा संशयित रुग्ण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. वाशी येथील रहिवासी असलेला इसम हा सौदी अरेबियात ३५ दिवस राहून मुंबईला परतला होता. इथे त्याला ताप, छातीत जळजळ, कफ असा त्रास होऊ लागला. ही ‘मर्स’ आजाराची लक्षणे आहेत.
नवी मुंबईत आठवडाभर उपचार घेतल्यानंतर खासगी डॉक्टरने त्याला तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवले. वॉर्ड ३० मध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला ‘ऑसेल्टामीवीर’ हे औषध देण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुंबईत ‘मर्स’ची भिती होती, ती यानिमित्ताने अधिक गडद झाल्याचे चर्चा सुरू झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.