श्याम मानवांचाही आरोप `सनातन`वरच!

सनातन सारख्या संघटनांचा या हत्ये मागे हात असू शकतो असा आरोपही मानव यांनी केलाय सनातन मध्ये वैचारीक लोक नाहीत केवळ रोबो आहेत त्यांच पूर्णपणे ब्रेन वॉशिंग केले आहे त्यांना काहीही सांगितले तर ते करू शकतात

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 25, 2013, 11:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जादुटोणा विरोधी कायदा येण्याच्या भीतीतून डॉ नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्याची शक्यता अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी व्यक्त केली आहे.
`सनातन` सारख्या संघटनांचा या हत्ये मागे हात असू शकतो असा आरोपही मानव यांनी केलाय सनातन मध्ये वैचारीक लोक नाहीत केवळ रोबो आहेत त्यांच पूर्णपणे ब्रेन वॉशिंग केले आहे त्यांना काहीही सांगितले तर ते करू शकतात अशा तरूणांना प्रशिक्षण देवून पुरोगामी विचारांना संपवण्याचे काम केले जात आहे असेही ते म्हणाले. डॉ.दाभेळकरांना आदरांजली वाहण्यासाठी दादरच्या शाहू सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सरकारनं आणलेल्या जादुटोणा विरोधी अध्यादेशाचे यावेळी स्वागत करण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.