बाळासाहेबांसमोर मान झुकवणाऱ्या मोदींचे वादग्रस्त पोस्टर हटविले

शिवसेना भवनसमोर लावण्यात आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मान झुकवणाऱ्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त पोस्टर हटविण्यात आलेय.

Updated: Oct 21, 2015, 05:12 PM IST
बाळासाहेबांसमोर मान झुकवणाऱ्या मोदींचे वादग्रस्त पोस्टर हटविले title=

मुंबई : शिवसेना भवनसमोर लावण्यात आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मान झुकवणाऱ्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त पोस्टर हटविण्यात आलेय.

शिवसेनेने सेना भवनच्या परिसरात भाजपावर थेट टीका करणारे पोस्टर लावले आहेत. 'विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना साहेबांच्या चरणी..' अशा प्रकारची पोस्टरबाजी शिवसेनेने केली होती.

या पोस्टरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांच्यापासून ते शरद पवार, राज ठाकरे, नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो लावण्यात आले होते.

शिवसेना भवनसमोरील हे  पोस्टर अधिकृत नाही, शिवसेनेची ती भूमिका नाही. कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात ते पोस्टर लावले असेल, यावर कृपया आणखी चर्चा करू नये, स्पष्टीकरण प्रसिद्धीप्रमुख हर्षल प्रधान यांनी केलेय. पोस्टरवरून रंगलेल्या वादानंतर शिवसेनेने स्पष्टीकरण केलेय. दरम्यान, हे पोस्टर काढण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.