शिवसेना-भाजपमध्ये तणाव, एक तृतीयांश वाटा देण्यास नकार

सरकारमध्ये सामील होण्याच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमधील तणाव पुन्हा वाढलाय. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद तसेच अनेक महत्त्वाची खाती हवी आहेत. मात्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदच नसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतलीय.

Updated: Nov 4, 2014, 07:45 AM IST
शिवसेना-भाजपमध्ये तणाव, एक तृतीयांश वाटा देण्यास नकार  title=

मुंबई : सरकारमध्ये सामील होण्याच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमधील तणाव पुन्हा वाढलाय. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद तसेच अनेक महत्त्वाची खाती हवी आहेत. मात्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदच नसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतलीय.

महत्त्वाची खातीही सोडायला भाजप तयार नाही. एवढंच नव्हे तर सरकारमध्ये एक तृतीयांश वाटा द्यायलाही भाजप तयार नाही. भाजपच्या या भूमिकेमुळं शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. 

येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत प्रतिसादाची वाट पाहू. अन्यथा शिवसेना आपली भूमिका जाहीर करेल, असं आता सेनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे भाजपचे अल्पमतातील सरकार भ्रष्टवादी म्हणून हिणवलेल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार का, याची चर्चा आता सुरु झाली आहे. 

दरम्यान, अधिवेशनापूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी सांगितलं आहे. सरकारमध्ये सामील होण्याची कोणतीही घाई नसल्याचं यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे, हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्यात येईल असं शिवसेना नेते अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. शिवसैनिक तसेच काही नेत्यांमध्ये सरकारमध्ये सामील होण्याविषयी वेगवेगळी मतं दिसून आली आहेत. मात्र शिवसैनिकांनी सरकारमध्ये सामील होऊ नये असंच म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.