शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, महत्वाची मंत्रिपद नाहीत - सूत्र

Updated: Nov 3, 2014, 07:24 PM IST
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, महत्वाची मंत्रिपद नाहीत - सूत्र title=

 

मुंबई : शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद तसेच महत्वाची मंत्रिपद देण्यास भाजपने नकार दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेची सत्तेसाठी होणारी ससेहोलपट अजून तरी थांबतांना दिसत नाहीय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून झालेल्या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन महत्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवली होती, मात्र भाजपने शिवसेनेसाठी असं काहीही शिल्लक ठेवलेलं दिसत नाहीय. यामुळे जागावाटपात ज्या प्रमाणे शिवसेनेला ज्या प्रकारे न जिंकता येणाऱ्या जागा वाट्याला देण्याचा प्रयत्न होता, तशी मंत्रिपदं शिवसेनेच्या वाटेला येण्याची शक्यता वाढली आहे.

शिवसेनेला अजुनही उपमुख्यमंत्रीपद दूरच असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच महत्वाची पदंही मिळणार नसतील तर शिवसेना सत्तेत सामिल होईल का याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.