मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटलाय. दहिसरमध्ये पुनहा एकदा शुभा राऊळ-शीतल म्हात्रे विरुद्ध घोसाळकर असा संघर्ष निर्माण झालाय.
शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि नगरसेवक अवकाश जाधव यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी दाखल केली. या तक्रारीनंतर या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या तीन नगरसेवकांनी 14 जानेवारीला वॉर्ड क्रमांक आठमध्ये कर्मयोग उद्यानाचे उदघाटन आचारसंहिता लागल्यानंतर केले होते. यावरुनच घोसाळकर यांनी तक्रार दाखल केली होती. घोसाळकर विरुद्ध शुभा राऊळ-शीतल म्हात्रे हा वाद गेल्या चार वर्षापासून सुरु आहे.