www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रन मुंबई रन चा नारा देत मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. हजारो मुंबईकरच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या धावपंटूंनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाय.
पहाटे ५.४० मिनिटांनी हाफ मॅरेथॉनला बांद्रा रिक्लेमेशन इथून सुरुवात झाली. मुंबईकर मोठ्या जोशात आणि जल्लोषात मॅरेथॉनमध्ये धावताना दिसलेत. ४२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन सर्वाधिक प्रतिष्ठीत समजली जाते. दरवर्षी प्रमाणं यंदाही पाच विभागात मुंबई मॅरेथॉन होतेय.
मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम मॅरेथॉन, सिनीअर सिटीझन मॅरेथॉन आणि अंपगांसाठी मॅरेथॉन होणार आहे. जवळपास ४० हजार स्पर्धेक या स्पर्धेत धावताय. ६ किलोमीटरची ड्रिम रन ही तर
साऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. कारण या प्रकारात सामान्य मुंबईकरांपासून सेलिब्रिटीज या प्रकारात आपला स्टॅमिना आजमावतात.
याशिवाय २ किलोमीटरच्या अंपगांसाठीच्या गटातली अनेक अपंग नागरिक जिद्दिनं सहभागी होत असतात. यावर्षीही केनियन आणि इथियोपियातील धावपटूंचंच मॅरेथॉनवर वर्चस्व असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुरुष अर्धमॅरेथॉन बंगळुरुच्या इंद्रजित पटेलनं जिकंलीय. तर कोची मॅथ्यू दुसऱ्या क्रमांकांवर आला. तर मानसिंग तिसऱ्या क्रमांकानं पूर्ण केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.