मुंबई : मुंबई महापालिकेनं पाणीकपात पूर्णपणे मागे घेतलीय. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. याआधी मुंबईची 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली होती. त्यानंतर आता उरलेली 10 टक्केही मागे घेण्यात आली. त्यामुळे आता मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय.
सुरुवातीला पाऊस लांबल्याने पाणी समस्या उद्धभवली. तसेच तलाव आणि धरणातील पाणीसाठी संपला होता. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. आता निर्णय रद्द करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.