बिल्डरच्या फसवणुकीला चाप लावणारा रेरा १ मे पासून

बिल्डरांकडून होणारी फसववणुकीविरोधात दाद मागण्यासाठी रेरा कायदा 1 मे पासून अंमलबजावणी होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 24, 2017, 09:26 AM IST
बिल्डरच्या फसवणुकीला चाप लावणारा रेरा १ मे पासून title=

मुंबई : बिल्डरांकडून होणारी फसववणुकीविरोधात दाद मागण्यासाठी रेरा कायदा 1 मे पासून अंमलबजावणी होणार आहे. या कायद्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

 हा कायदा आमलात आल्यानंतर बिल्डराला प्रोजेक्टची माहिती शासकिय प्राधिकरण वेबसाईटवर द्यावी लागेल. त्याचबरोबर कंपनी, संचालक, त्याची आर्थिक स्थिती याचीही माहिती द्यावी लागेल.

प्रकल्पासोबत दिल्या जाणा-या सोईसोविधा तसेच कालावधी याचीही माहिती बिल्डराला द्यावी लागेल. नियम पाळले नाही तर ग्राहकांना प्राधिकरणाकडे दाद मागता येणार आहे, त्यानंतर बिल्डरावर आर्थिक-दंडात्मक कारवाई केली जाईल.