मुकेश अंबानी आणि उर्जित पटेल यांच्यात नातं काय आहे?

रिलायन्सचे उद्योजक मुकेश अंबानी आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यात काय नातं आहे, हे जाणून घेण्यामागे एक कारण आहे. कारण उर्जित पटेल हे मुकेश अंबानी यांचे जावई आहेत, नातेवाईक आहेत आणि रिलायन्सला याचा फायदा होतोय.

Updated: Nov 28, 2016, 11:33 PM IST
मुकेश अंबानी आणि उर्जित पटेल यांच्यात नातं काय आहे? title=

मुंबई : रिलायन्सचे उद्योजक मुकेश अंबानी आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यात काय नातं आहे, हे जाणून घेण्यामागे एक कारण आहे. कारण उर्जित पटेल हे मुकेश अंबानी यांचे जावई आहेत, नातेवाईक आहेत आणि रिलायन्सला याचा फायदा होतोय.

तसेच आरबीआय रिलायन्सचा फायदा कसा होईल हे पाहून निर्णय घेत आहे, असे मेसेजेस व्हॉटस अॅपवर व्हायरल होत आहेत. मात्र यामागे नेमकं सत्य काय आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

आता जाणून घ्या... खरं काय?

मुकेश आणि नीता अंबानी यांना तीन मुलं आहे, ईशा, आकाश आणि अनंत. यात निशा २५ वर्षांची आहे, तिचं लग्न झालेलं नाही. दुसरीकडे अनिल अंबानी यांना दोन मुलं आहेत, जय आणि अनमोल. तेव्हा हे स्पष्ट होतंय की, ५३ वर्षाचे उर्जित पटेल हे अंबानी परिवाराचे जावई नाहीत.

मात्र पटेल आणि अंबानी यांच्यात हाच संबंध आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीत उर्जित यांनी काम केलं आहे. उर्जित पटेल यांचं लग्न जरूर झालं आहे, पण आता ते वेगळे राहतात, ते आपल्या आईबरोबर मुंबईत राहतात.