रिझर्व्ह बँकेने 16 वर्षांनंतर राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध उठवले

तब्बल 16 वर्षांनंतर अखेर राज्य सहकारी बँकेला दिलासा मिळाला. रिझर्व्ह बँकेने 1996 सालापासून घातलेले निर्बंध अखेर उठवले आहेत. बँकेच्या नव्या सात शाखांनाही परवानगी मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या अटी पूर्ण केल्यामुळे अखेर हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. 

Updated: Oct 27, 2016, 07:26 PM IST
रिझर्व्ह बँकेने 16 वर्षांनंतर राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध उठवले title=

मुंबई : तब्बल 16 वर्षांनंतर अखेर राज्य सहकारी बँकेला दिलासा मिळाला. रिझर्व्ह बँकेने 1996 सालापासून घातलेले निर्बंध अखेर उठवले आहेत. बँकेच्या नव्या सात शाखांनाही परवानगी मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या अटी पूर्ण केल्यामुळे अखेर हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. 

प्रशासकीय काळात राज्य सहकारी बॅंकेच्या स्थितीत सुधारणा
- बँकेच्या ठेवीत १३ टक्क्यांनी वाढ 
- बॅंकेने दिलेल्या कर्जामध्ये २० टक्के वाढ 
- खेळत्या भांडवलात ११ टक्के वाढ

२०१० साली असलेला ७७५ कोटी रुपयांचा तोटा भरून काढून मार्च मार्च २०१६ अखेर बँकेला 243?कोटी रुपयांचा निव्वळ नफा

- राज्य सहकारी बॅंकेवरील निर्बंध रिझर्व्ह बॅंकेने उठवले
- रिझर्व्ह बॅंकेने १९९६ साली ११ निर्बंध लादले होते 
- रिझर्व्ह बॅंकेने घातलेल्या अटी पूर्ण केल्यामुळे निर्बंध उठवले 
- १६ वर्षांनी उठले निर्बंध
- बॅंकेच्या नव्या सात शाखांनाही रिझर्व्ह बॅकेची परवानगी 

बँकेतील एनपीएची टक्केवारी ३१.२२ वरून मार्च २०१६ पर्यंत ९.२७ इतकी खाली आली आहे.                        
- सीआरएमध्ये उणे १.५० वरून वाढ होऊन १५.०१ इतका                        
- बॅंकेचे नेटवर्थमध्ये वाढ होऊन ते १९६१ कोटींपर्यंत वाढ                        
- बॅंकेने सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे.