मुंबई : सायरस मिस्त्रींनी टाटा सन्सच्या संचालकांना पाठवलेल्या कथीत पत्रानंतर टाटाचे शेअर्स पुन्हा गडगडले आहेत.
नफ्यात नसलेल्या उद्योगांमध्ये टाटा समूहातील कंपन्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे त्यामुळे 1 लाख 18 हजार कोटीवंर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे असं या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र फुटले असून त्यातून अनेक धक्कादायकबाबी समोर आल्या आहेत.
समूहाची सूत्रे स्विकारल्यानंतर टाटा सन्सच्या कलमांत बदल करण्यात आला. त्यामुळे निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र मिळालंच नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान या कथीत पत्रानंतर सकाळी शेअर बाजार उघडताच टाटा समूहातील कंपन्यांचे शेअर पुन्हा एकदा गडगडले. टाटा समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर्स 3 ते 5 टक्क्यांनी घसरलेत. बाजार सुरु होताच सेन्सेक्स 100 तर निफ्टी तब्बल 30 अंशांनी खाली आला होता.