मुंबई : राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे, त्यानंतर राज ठाकरेंनी यांनी उद्यापासूनचे सुरु होणारे सर्व नियोजित दौरे पुढे ढकलले आहेत. सध्या उर्वशी ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे आज मुंबईत आपल्या मैत्रिणीसोबत मोटरसायकलनं निघाली होती. मात्र मोटरसायकल रस्त्यावरुन घसरल्यानं उर्वशीच्या पायासोबत चेहऱ्यालाही मार लागला आहे. दरम्यान राज ठाकरेंची मुलगी उर्वशी ठाकरे प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
उर्वशी ठाकरे यांच्या अपघातामुळे आता ३ आणि ४ आणि ५ नोव्हेंबर रोजीचे राज ठाकरे यांचे दौरे पुढे ढकलण्यात आले आहे. या दौऱ्यांचं सुधारीत वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आलं नाही. पण, लवकरच त्याची माहिती देण्यात आली आहे.
राज ठाकरे उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार होते. पण, त्यांच्या मुलीचा अपघात झाला. त्यामुळं त्यांच्या दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.