नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर, पाहा कोणाकडे कोणतं खातं

नव्या सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्यासह अन्य अतिरिक्त खाती आणि अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील. 

Updated: Nov 2, 2014, 03:56 PM IST
नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर, पाहा कोणाकडे कोणतं खातं title=

मुंबई: नव्या सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्यासह अन्य अतिरिक्त खाती आणि अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील. 

सर्वच मंत्र्यांकडे एकाहून अधिक खाते आहेत. ही अतिरिक्त खाती मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दुसऱ्या मंत्र्यांना सोपवण्यात येण्याचीही शक्यता आहे. 

पाहा कोणाकडे कोणतं खातं

महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ                                            www.24taas.com

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) : गृह आणि नगरविकास, (तसेच सध्या वाटप न करण्यात आलेली खाती)

एकनाथ खडसे  :  महसूल, कृषी, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास मंत्री

सुधीर मुनगंटीवार :  अर्थ आणि नियोजन, वनमंत्री           www.24taas.com

विनोद तावडे  : उच्च आणि तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री

प्रकाश मेहता  : उद्योग आणि खाण, संसदीय कार्यमंत्री

पंकजा मुंडे  : ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण, जलसंधारण मंत्री

चंद्रकांत पाटील  :  सार्वजनिक बांधकाम, सहकार आणि पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री

विष्णू सावरा  :  आदिवासी विकास, सामाजिक न्यायमंत्री          www.24taas.com

राज्यमंत्री 
दिलीप कांबळे  : आदिवासी, सामाजिक न्याय राज्यमंत्री

विद्या ठाकूर  : महिला आणि बालविकास राज्यमंत्री             www.24taas.com

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.