राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. उत्तरप्रदेश निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

Updated: Mar 16, 2017, 02:26 PM IST
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. उत्तरप्रदेश निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर संवाद झाला. काही मिनिटं दोघांमध्ये चर्चा ही झाली. याआधी गेल्यावर्षी मे महिन्यात नीट परिक्षार्थींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांनी मोदींना फोन केला होता. तेव्हा देखील दोघांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशात मिळालेल्या मोठ्या यशानंतर राज ठाकरेंनी मोदींना फोनवरुन शुभेच्छा दिल्या.