मुंबई : शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार 30 हजार कोटींची बागुलबुवा दाखवत आहे. कर्जमाफी घोषणा करा आम्ही तुमच्या बरोबर दिल्लीत येतो. विजय मल्ल्याचे कर्ज माफ करता. सरकार प्रामाणिक असेल तर कर्जमाफीची घोषणा करावी. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, थेट इशारा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, बॅकांचे घोटाळे लपविण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे, असे प्रत्युत्तर कर्जमाफीच्या निवदेनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे.शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभेत गोंधळ विरोधकांनी घातला. या गोंधळातच मुख्यमंत्र्यांनी आपले निवदेन दिला. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांची वेलमध्ये घोषणाबाजी दिला.
शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जमाफी दिलीच पाहिजे, अशा घोषणा दिल्यात. गोंधळामुळे अर्धा तास विधानसभा कामकाज तहकूब करण्यात आले.