मुंबई : मुंबईकरांची सकाळ आज मान्सून पावसानं उगवली. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रिमझिम पाऊस सुरु आहे.
मुंबईत वरळी, दादर, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, घाटकोपर परिसरात पावसाच्या सरी कोसळतायत. ठाणे परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावलीय.
या पावसामुळं हवेत सुखद गारवा निर्माण झालाय. कुलाब्यात २४.२ मिमी तर सांताक्रुझमध्ये ३६.७ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळं गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यामुळं हैराण असलेल्या मुंबईकरांना या पावसामुळं दिलासा मिळालाय.
हा मान्सून पाऊस असून पावसासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान येत्या काही तासांत कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवलीय.
पावसामुळं मध्यरेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरु आहे. तसंच मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडण्याचा इशाराही वेधशाळेनं दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.