मुंबई: मुंबईकरांना आणखी काही दिवस मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून तिथंच रेंगाळलाय.
दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाल्यानं तो उत्तरेकडं सरकण्याची सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. परंतु यासाठी अजून काही दिवस जावे लागतील, अशी माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय. त्यामुळं मुंबईकरांचा हा आठवडाही मान्सूनची वाट पाहण्यातच जाणार आहे.
परंतू मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा दिलाय. रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशोबा वादळ आज रात्रीपर्यंत ओमानच्या जमिनीवर येण्याची शक्यता असल्यानं अरबी समुद्रातील वाऱ्याची स्थिती पूर्ववत होईल, अशी आशा हवामानतज्ज्ञ बाळगून आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.