'हिंमत असेल तर ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा'

ठाकरे कुटुंबाची संपत्ती हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. त्यात महापालिका निवडणुकीत तर हा मुद्दा शिवसेना आणि भाजपचा 'प्रतिष्ठेचा' आणि तितकाच 'जिव्हाळ्याचा'ही विषय ठरतोय.

Updated: Feb 16, 2017, 05:50 PM IST
'हिंमत असेल तर ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा' title=

मुंबई : ठाकरे कुटुंबाची संपत्ती हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. त्यात महापालिका निवडणुकीत तर हा मुद्दा शिवसेना आणि भाजपचा 'प्रतिष्ठेचा' आणि तितकाच 'जिव्हाळ्याचा'ही विषय ठरतोय.

उद्धव ठाकरेंनी त्यांची संपत्ती वेबसाईटवर जाहीर करावी, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं... त्यावरच आता हिंमत असेल तर ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करा, असं आव्हान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिलंय. कुठलीही बेहिशेबी मालमत्ता ठाकरे कुटुंबीयांकडे नाही, कुठलाही घोटाळा ठाकरेंनी केलेला नाही, असं शेवाळे म्हणाले.

यावरून, आता संपत्तीच्या मुद्द्यावर शिवसेना भाजप संघर्ष टोकाला पोहोचलेला दिसतोय. शिवसेनेतल्या काही बड्या नेत्यांनी अफरातफर केल्याचा खळबळजनक आरोपही सोमय्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार राहुल शेवाळे यांनी सोमय्या स्वतःच बिल्डरचे दलाल असल्याचा घणाघाती आरोप केलाय. आता सोमय्यांच्या आरोपानुसार उद्धव ठाकरे यांच्यावर मनी लाँडरींगची तक्रार दाखल करावी, अशी मागणी संजय निरूपम यांनी केलीय.