राज ठाकरेंनी उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जोरदार खिल्ली उडवली. कालपर्यंत मोदींची स्तुती करणारे राज ठाकरे आता चक्क मोदींच्या विरोधात भूमिका घेत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Updated: Jul 11, 2014, 10:34 PM IST
 राज ठाकरेंनी उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली  title=

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जोरदार खिल्ली उडवली. कालपर्यंत मोदींची स्तुती करणारे राज ठाकरे आता चक्क मोदींच्या विरोधात भूमिका घेत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

सोशल मीडियाचा वापर करून नरेंद्र मोदींनी जे वातावरण निर्माण केलं, ते वारंवार निर्माण होत नसतं. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर मोदी मोदी करणारे आता विरोधात बोलतायत, असं सांगतानाच सोशल मीडिया हे माध्यम चांगलं आहे, पण त्याच्या आहारी जाऊ नका, असा सल्ला राज ठाकरेंनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात बोलताना दिला.

सोशल मीडिया नसतानाही मी 25 वर्षे राजकारणात आहे, अशी पुस्तीही राज ठाकरेंनी जोडली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.