मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत वरुणराजा चांगलाच बरसतोय. मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 36 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
दुपारी 3 वाजल्याच्या दरम्यान सँटहर्स्ट रोड स्थानकाजवळील भिंत कोसळल्याची घटना घडलीय. यामुळे हार्बर रेल्वेच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. जवळपास 15 मिनिटांसाठी वाहतूक होती ठप्प होती.
ट्राफिक अपडेट :
दुपारी 1.15 वाजता
- मुलुंड-भांडुप परिसरातही पाणी साचलं
- पूर्व द्रूतगती महामार्ग आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी
दुपारी 12.55 वाजता
- फितवाला रोड इथं पाणी साचलं
- एलफिस्टन स्टेशन परिसरात पाणी साचलं
दुपारी 12.30 वाजता
- एलबीएस मार्गावरही साचलं पाणी
दुपारी 12.15 वाजता
- मुंबईत दुपारनंतर स्कूल बसेस धावणार नाहीत, पावसामुळे स्कूल बस असोसिएशनचा निर्णय... 70 टक्के स्कूल बसेसला सुट्टी... शाळेलाही जाहीर करण्यात आली सुट्टी
सकाळी 11.45 वाजता
- हिंदमाता, परळमध्ये सखोल ठिकाणी पाणी
- डॉ. आंबेडकर मार्गावर पाणी साचलं
- बोरिवली ते बांद्रा दरम्यान संतगतीन
- मुलुंड भांडुप वाहतूक धिम्या गतीनं
सकाळी 11.00 वाजता
- पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम
- इस्टर्न एक्स्प्रेसवेवर वाहतुकीची कोंडी
- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जाम बोरिवली ते बांद्रा दरम्यान वाहतूकीची कोंडी
रेल्वे अपडेट
दुपारी 12.30 वाजता
- हार्बर रेल्वेरील वाहतूकही ठप्पच
सकाळी 11.45 वाजता
- हार्बर रेल्वे लाईनवर वाहतूक ठप्प
- मध्य रेल्वे 15-20 मिनिटे उशीरानंच
- पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक संथगतीनं
सकाळी 11.00 वाजता
- मध्य, हार्बर, प.रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
- मध्य रेल्वेवरील वाहतूक 15-20 मिनिटे उशीरानं
- हार्बर, पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीचाही खोळंबा
सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मुंबई शहरात 42.69 मिमी, पूर्व उपनगरात 38.25 मिमी आणि पश्चिम उपनगरात 28.23 मिमी पाऊस पडल्याची नोंद झालीय. हिंदमाता, परळ टीटी, कुर्ला स्टेशनबाहेर, वरळी सी फेस इथं या सखोल भागांत पाणी साचल्याची माहिती मिळतेय.
आता पावसाचा जोर ओसरला असला तरी 11 वाजून 27 मिनिटांनी धडकलेल्या 4.36 मीटरच्या हायटाईडमुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांत पाणी साचलं होतं. आता, हायटाईड कमी होत असल्यानं साचलेल्या पाण्याचाही लवकरच निचरा होईल, असा दावा पालिकेनं केलाय.
पावसाचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय तर पूर्व आणि पश्चिम महामार्गावर वाहतूक कोंडी झालीय. एलबीएस मार्गावरील वाहतूक धिम्या गतीनं सुरूय. पावसामुळे मुंबईला ब्रेक लागलाय... अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालंय...
ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांतही असाच पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. वसईत पावसांनं काल रात्रीपासून दमदार हजेरी लावलीये. पावसामुळे नवघर बसडेपो तसंच नालासोपा-यातील काही सखल भागांत पाणी साचलं होतं. पावसानं हजेरी लावल्यानं वसईकर चांगलेच सुखावलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.