मुंबई : पोलीस कर्मचारी कुटुंबातील महिला सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी पोलीस कुटुंबीयांनी राज ठाकरे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. पोलिसांना संरक्षण, नोकरीवरील ताण, सुट्ट्या, घराचा प्रश्न, नोकरी यासंदर्भात पोलीस कुटुंबीयांनी राज यांच्याशी चर्चा केली.
यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी आधीच चर्चा केल्याचं राज यांनी या कुटुंबीयांना सांगितलं. पोलिसांच्या समस्यांबाबत ते काय निर्णय घेतात यासाठी पंधरा दिवस वाट पाहणार असल्याचं राज यांनी म्हटलंय. अन्यथा पंधरा दिवसांनंतर भूमिका मांडणार असल्याचं राज यांनी सांगितलं आहे.