व्हिडिओ : ...आणि राज म्हणाले 'आमचे बंधु आले'!

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच ठिकाणी दिसले... साहजिकच सगळ्यांचं लक्ष या दोघांकडेही होतंच.

Updated: Dec 12, 2015, 10:34 PM IST

 

मुंबई : शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच ठिकाणी दिसले... साहजिकच सगळ्यांचं लक्ष या दोघांकडेही होतंच.

या कार्यक्रमात मंचावर राज ठाकरे भाषण करत असताना नेमकी उद्धव ठाकरेंची सभागृहात एन्ट्री झाली... अर्थातच, सगळ्यांचं लक्ष आता राज काय म्हणतात लागलं होतं... आणि विशेष म्हणजे हीच संधी साधून 'आमचे बंधू आले' असं म्हणत राज ठाकरेंनीही आपलं भाषण काळी सेंकदांकरिता थांबवलं. 

अधिक वाचा - उद्धव ठाकरेंनी वाचला पवारांचा 'बारा'चा पाढा!

निवेदक सुनिल बर्वे यांनीही 'याला म्हणतात टायमिंग' असं म्हटलं आणि राज ठाकरेंनीही 'बघा काय टायमिंग' आहे असं म्हणत त्यावर तेथे उपस्थित प्रत्येकाच्या टाळ्या मिळवल्या. 

मुंबईतील नेहरु सायन्स सेंटरमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील 75 प्रमुख घटनांचा उल्लेख असलेल्या 'आधारवड' या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.