चोर समजून प्रवाशांनी 'त्या'ला दिला बेदम चोप

आसमानसे गिरे खजुरमे अटके असाच काहीसा प्रकार घडलाय दादर स्टेशनवर. विदाऊट तिकीट असल्यानं टीसी पासून वाचण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला. त्या नादात त्याची बॅग एका महिलेला लागली आणि तो स्टेशनवर असलेल्या इतर प्रवाशांच्या हाती सापडला. 

Updated: May 2, 2016, 02:13 PM IST
चोर समजून प्रवाशांनी 'त्या'ला दिला बेदम चोप title=

मुंबई : आसमानसे गिरे खजुरमे अटके असाच काहीसा प्रकार घडलाय दादर स्टेशनवर. विदाऊट तिकीट असल्यानं टीसी पासून वाचण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला. त्या नादात त्याची बॅग एका महिलेला लागली आणि तो स्टेशनवर असलेल्या इतर प्रवाशांच्या हाती सापडला. 

नुसताच सापडला नाही तर या प्रवाशांनी चोर समजुन त्याला चांगलाच चोपही दिला. घडलं असं की कासिम अली कल्याणहून दादरला आला. तिथून माहिमला जायला निघाला पण समोर दिसला टीसी आणि कासिमकडे माहिमला जाण्यासाठी तिकीट नव्हत. मग काय टीसीपासून बचावासाठी कासिमनं पळायला सुरूवात केली. 

पळण्याच्या नादात त्याची बॅक एका महिलेला लागली. तिचं डोकं फुटलं. हे पाहिलेल्या काही प्रवाशांनी कासिमला चोर समजुन चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं.
 
चौकशीअंती हा सगळा प्रकार समोर आला. मग विदाउट तिकीट असलेल्या कासिमकडून पोलिसांनी दंड वसूल केला. त्यानंतर जखमी महिलेलाही कासिमची दया आली. तिनंही मग त्याच्या विरोधात तक्रार नोंदवायला नकार दिला.