मुंबई : रिक्षाचा परवाना हवा असेल, तर मराठी बोलता येणं अनिवार्य असणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय.
१ नोव्हेंबरनंतर केवळ मराठी भाषा बोलता येणाऱ्यांनाच रिक्षा परवाना मिळेल, असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.
राज्यातल्या एक लाख चाळीस हजार पासष्ट रिक्षांचे परवाने रद्द झालेत. या रिक्षांना काही अटींवर परवाने नूतनीकरणाची संधी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
ऑक्टोबर महिन्यात हे नूतनीकरण केलं जाणार आहे. मात्र हे परवाने देताना मराठी भाषा येणं बंधनकारक असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.