चर्चगेट-विरार फास्ट मार्गावर 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली...

पश्चिम फास्ट मार्गावर सायंकाळी 7.35 वाजता म्हणजेच जवळपास 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली. फास्ट ट्रॅकच्या डाऊन मार्गावर (चर्चगेट - विरार) मार्गावर ही रेल्वे धावली. मात्र, फास्ट अप मार्गावरची वाहतूक मात्र अद्यापही ठप्पच आहे. 

Updated: Sep 15, 2015, 08:20 PM IST
चर्चगेट-विरार फास्ट मार्गावर 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली... title=

मुंबई : पश्चिम फास्ट मार्गावर सायंकाळी 7.35 वाजता म्हणजेच जवळपास 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली. फास्ट ट्रॅकच्या डाऊन मार्गावर (चर्चगेट - विरार) मार्गावर ही रेल्वे धावली. मात्र, फास्ट अप मार्गावरची वाहतूक मात्र अद्यापही ठप्पच आहे. 

प्रवाशांना चर्चगेटहून विरारला जाण्यासाठी केवळ स्लो ट्रॅकचा पर्याय खुला आहे. मात्र, खोळंबलेल्या प्रवाशांसाठी मात्र हा पर्याय अपुरा पडतोय. 

अंधेरी-विले-पार्ले दरम्यान लोकल घसरल्यामुळं पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. 
गेल्या 10 तासांपासून पश्चिम रेल्वेची फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे, प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.

पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी आहे. दुरूस्तीचं काम रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. त्यामुळं आज प्रवाशांना घरी पोहचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 

दरम्यान, बेस्टनं प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम उपनगरांमध्ये 165 अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.