पोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती

 मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीला पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले पण तो त्यापूर्वीच जागा होऊन उभा राहिला. 

Updated: Oct 12, 2015, 02:15 PM IST
पोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती  title=

मुंबई  :  मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीला पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले पण तो त्यापूर्वीच जागा होऊन उभा राहिला. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनूसार रविवारी सकाळी ११.१५ मिनिटांननी सायन पोलिसांननी एक फेल आला. त्यात एसटी डेपोमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात आले होते. पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमने त्या व्यक्तीला उचचले आणि सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

यावेळी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रोहन रोहेकर उपस्थित होते. चेकअप केल्यानंतर त्यांनी त्याला मृत घोषीत केले. डेड बॉडीला शवागारात पाठविण्यात आले. 

डेड बॉडी कॅज्युअटी वॉर्डात कमीत कमी दोन तास ठेवले जाते. याला कुलिंग ऑफ पिरिअड म्हणतात. या ठिकाणी रिव्हाव्हल चान्स असतो. 

बॉडी पांढऱ्या कपड्याने झाकलेली होती. आणि डॉक्टरांनी त्वरीत कॅज्युअलिटी वॉर्डच्या डायरीमध्ये एन्ट्री केली आणि त्या शवागारात पाठविण्यात आले. बॉडीला शवागारात एका स्ट्रेचरमध्ये पाठविण्यात आले. स्टाफमध्ये असलेले सुभाष आणि सुरेंद्र बॉडीला लिफ्टमध्ये नेत असताना त्यांना धक्का बसला. सुभाषने सांगितले, की मेलेल्या व्यक्तीचा श्वास सुरू आहे. श्वास घेतल्यावर पोट खालीवर होत आहे. 

काही वेळात पेशंटला जाग आली. हॉस्पिटलच्या स्टाफने सांगितले की, जसा तो व्यक्ती जिवंत असल्याचं कळाल्यावर डॉक्टर शवागाराकडे पळाले. दरम्यान या युवकाची ओळख पटली नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.