ननवरील बलात्कार प्रकरणी मुंबईतून एकाला अटक

पश्चिम बंगालमधील ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील सीआयडी अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या सहाकार्यानं नागपाडा इथून सलिम शेख या आरोपीस आज अटक केली. 

Updated: Mar 26, 2015, 02:50 PM IST
ननवरील बलात्कार प्रकरणी मुंबईतून एकाला अटक title=

मुंबई: पश्चिम बंगालमधील ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील सीआयडी अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या सहाकार्यानं नागपाडा इथून सलिम शेख या आरोपीस आज अटक केली. 

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात १४ मार्च रोजी वयोवृद्ध ननवर दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर त्यांनी कपाटातील १२ लाख रुपये चोरून पोबारा केला होता. या प्रकरणातील माहिती घेऊन पश्चिम बंगाल पोलीस आमच्याकडे आले होते आणि त्यांनी मदतीची मागणी केली. त्यांना आवश्यक ती मदत देण्यात आल्यावर त्यांनी एका आरोपीला नागापाडा इथून अटक केली. 

त्या आरोपीला घेऊन अधिकारी रवाना झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या पीडित ननला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.