मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भारतात आणण्याच्या हालचालींना आज कमालीचा वेग आलाय.
आज यासंदर्भात कार्यालयात ऱॉ आणि आयबीच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू झालीय.. डॉन छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आलीय. त्याच्या प्रत्यर्पणासाठी आता भारतानं प्रयत्न सुरू केलेत. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक बोलावण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही याबाबत संकेत दिलेत.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजनवर सरकारनं बजावलेल्या रेड कॉर्नर नोटीसची माहिती दिली जात असल्याचं सांगितलंय... राजनप्रमाणेच दाऊदलाही पकडण्याचे केंद्राचे प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.