मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमक्या येत असल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यानंतर आता तिसरा कोणाचा क्रमांक लागणार, असा सवाल धनंजय मुंडे यांनी रविवारी सरकारला केला.
जितेंद्र आव्हाड यांना धमक्या येत असून, त्यांचा क्रमांक लागू नये म्हणून सरकारने खबरदारी घेण्याची मागणी त्यांनी केली. तिसरा कौन ही विचारण्याची नामुष्की आल्याची खंत मुंडे यांनी बोलून दाखविली. पुरोगामी चळवळीतील नेत्यांना संपविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न आहे.
पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या काही जणांना धमक्यांची पत्रे येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमक्यांची पत्रे आली आहेत. त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केलीय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.