मुंबई : दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत अद्याप दिलेली नाही. या विरोधात आज विरोधकांनी विधानसभेत रणकंदन केलं.
विरोधकांनी राज्यपालांच्या गाडीला घेराव घातला. सरकारविरोधात घोषणा देत शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या चहापानावर यापूर्वीच विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
शेतकऱ्यांना मदत देतांना हेक्टरी मदत कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात येत आहे. जेवढी जमीन जास्त तेवढा तोटा अधिक असतो, निदान एका शेतकऱ्याला २ हेक्टरी मदत देण्याची तरतूद आहे. तरी देखिल फक्त १ हेक्टरवर मदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.