दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: दुष्काळाबाबत राज्य सरकारच्या निष्क्रियेविरोधात राष्ट्रवादीनं जेलभरो आंदोलनाची हाक दिलीय खरी... पण त्यापासून अजित पवार आणि सुनिल तटकरेंना जाणून बुजून दूर ठेवलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय.
अधिक वाचा - सिंचन घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांना समन्स
मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात होणाऱ्या या आंदोलनाचं नेतृत्व खासदार सुप्रिळा सुळे करणार आहेत. तटकरे आणि अजित पवार सोडून सगळ्या बड्या नेत्यांना मराठवाड्यातले आठही जिल्हे वाटून देण्यात आलेत. पण विधीमंडळ पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे मात्र या आंदोलनापासून दूर राहणार आहेत.
अधिक वाचा - 'हेक्स वर्ल्ड' भुजबळांना गोत्यात आणणार?
वादग्रस्त वक्तव्य आणि सिंचन घोटाळ्याबाबतची एसीबीची चौकशी यामुळेच अजित पवारांना दूर ठेवलं जातंय का? अशी चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.