राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटला मोंदीचे लाइक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटमधील Aesthetic Vision - The Key to Progress ! हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओला फेसबूकवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लाइक केले असून good idea अशी कमेंटही दिली आहे.

Updated: Mar 2, 2015, 05:42 PM IST
राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटला मोंदीचे लाइक title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटमधील Aesthetic Vision - The Key to Progress ! हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घालतो आहे.

राज ठाकरे यांच्या  एका चाहत्याने त्यांचे फेसबूकवर पेज तयार करून हा व्हिडिओ अपलोड केला आहे.  व्हिडिओला फेसबूकवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लाइक केले असून good idea अशी कमेंटही दिली आहे.

हा व्हिडिओ राज ठाकरेच्या मनसे अधिकृत या फेसबूक पेजवरून अपलोड करण्यात आलेला नाही. परंतु, राज ठाकरे यांचे विकासाला सौंदर्य दृष्टीने पाहण्याच्या दृष्टीकोनाचे मोदी यांच्या अधिकृत फेसबूक पेजकडून ही दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे या व्हिडिओला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 

राज ठाकरे यांच्या नावाच्या फेसबूक पेजवर त्यांच्या चाहत्याने हा व्हिडिओ १२ फेब्रुवारी रोजी अपलोड करण्यात आला. त्या व्हिडिओवर सुमारे १७५४० पेक्षा अधिक कमेंट आल्या. पण त्यातील एक कमेंट खूप महत्त्वाची होती. ती म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची... नरेंद्र मोदी यांच्या ऑफिशअल फेसबूक पेजवरून या व्हिडिओवर GOOD IDEA अशी कमेंट टाकण्यात आली. आहे.

हा व्हिडिओ ६,२२, ५९० जणांपर्यंत पोहचला असून १०१११ लाइक्स मिळाले आहेत. ६३१० जणांनी शेअर केला असून त्याला एकूण १ लाख ७० हजार ९५३ जणांना पाहिला आहे.

पाहू या तो व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.