मुंबई : रंगेहाथ पकडलेल्या लाचखोरांचे फोटो तुम्हाला आता फेसबुकवर पाहता येणार आहेत, यात लाचखोरांचे चेहरे पाहण्यासारखे असतात, निदान हे फोटो पाहून हा भ्रष्टाचाराचा कॅन्सर आटोक्यात येईल, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आहे.
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामाला सध्या जोर आला आहे. आठ महिन्यात 798 लाचखोरांना पकडण्यात त्यांना यश आलंय. एवढंच नाही तर लाचखोर जेव्हा लाच घेतांना पकडले जातात तेव्हा त्यांचा एक फोटो काढला जातो, एक फोटो आणि प्रेस नोट एसीबीच्या फेसबुक पेजवर लावली जाते.
फेसबुकने मागील काही दिवसांपासून हे फोटो लावण्यास सुरूवात केली आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षी लाचखोर पकडण्याची संख्या 430 ने वाढली आहे, या सोबत 67 कोटी रूपयांची संपत्तीही हाती आली आहे. लाचखोरांना जेरबंद करण्यासाठी काय करावं लागेल, तसेच लाचखोर पाहण्यासाठी www.facebook.com/MaharashtraACB वर लॉग इन करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.